कोरोना बाधित मृतदेहांवर शासनाच्या निर्देशानुसार अंत्यसंस्कार करण्याची भाजप जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांची मागणी

Adv. Deepak Patwardhan

रत्नागिरी /प्रतिनिधी : कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार होताना स्थानिक पातळीवर विरोध झाल्याने त्याला वेळ लागत आहे. ही बाब दुर्दैवी असून शासनाच्या निर्देशानुसार अंत्यसंस्कार व्हावेत अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

कोरोनाबाधित मृतदेहांच्या अंत्यसंस्काराबाबत काही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्थानिक परवानगी देत नाहीत अशी परिस्थिती निदर्शनास येत आहे. त्यामुळे मृत शरीरावर अंत्यसंस्कार होण्यासाठी खूप वेळ लागतो ही बाब दुर्दैवी आहे. याबाबत शासनाच्या निर्देशानुसार अंत्यसंस्कार व्हावेत अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. नियमित स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी काही अडचणी येत असतील तर निर्जन ठिकाणी अथवा स्मशानभूमीत राखीव जागा ठेऊन त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात यावेत असा उपाय देखील ऍड. दीपक पटवर्धन यांनी सुचवला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER