अजित पवारांच्या कार्यपद्धतीचा रोहित पवारांकडून फॉलो, पहाटे चार वाजता एपीएमसीत

Ajit Pawar - Rohit Pawar

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची कार्यपद्धती सर्वानाच ठाऊक आहे. कामाची पाहणी असो वा उद्घाटन, अजितदादा न चुकता वेळेवर हजर असतात. अजित पवारांच्या कार्यपद्धतीची त्यांचा पुतण्या आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनाही भुरळ पडली आहे. ते अजित पवार यांची कार्यपद्धती फॉलो करताना दिसत आहे. रोहित पवार यांनीही भल्या पहाटे नवी मुंबई एमपीएमसी मार्केट गाठले.

रोहित पवार हे पहाटे चार वाजताच नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले होते. पहाटे-पहाटे त्यांनी एपीएमसीमधील भाजी आणि फळ मार्केटचा दौरा केला. यावेळी रोहित पवार एपीएमसीमधील व्यापारी तसंच काही शेतकऱ्यांशी चर्चा करत एपीएमसीमधील यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांनी ठिकठिकाणी थांबून व्यापारी आणि शेतकऱ्यांची विचारपूस केली. शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये येणाऱ्या अडचणी येत्या अधिवेशनात मांडणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

अजित पवारांनीही सप्टेंबर महिन्यात पहाटे सहा वाजता पुणे मेट्रो स्टेशनला जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली होती. तर गेल्या वर्षी भल्या थंडीतही दिंडोरीतील शाळेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी ते पहाटे पोहोचले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER