‘आसमान मे उडने की मनाही नही है…. बस शर्त’,संजय राऊतांचे सूचक ट्विट

Sanjay Raut

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पाठवलेल्या लेटरबॉम्ब प्रकरणानंतर दिल्लीत राहून सातत्याने पत्रकारपरिषदांच्या माध्यमातून वर हल्लाबोल करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक नवे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत(Sanjay raut) यांनी आपल्या ट्रेडमार्क स्टाईलचा वापर केला आहे. त्यांनी एक शेर ट्विट केला आहे. ‘आसमान मे उडने की मनाही नही है…. बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे’, अशा मजकूर त्यामध्ये आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणासाठी आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सध्या फोन टॅपिंग आणि परमबीर सिंह यांच्या पत्रावरून संजय राऊत भाजपच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. तर दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदावरून संजय राऊत महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस सोबतही दोन हात करताना दिसत आहेत. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे वास्तवाकडे दुर्लक्ष करु नका, अशा आशयचा राऊतांचा हा संदेश नेमका कोणासाठी आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी ‘बुरा न मानो.. होली है………’ अशी कॅप्शनही लिहली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER