फुलली रश्मीची बाग

Rashmi Anpat

कोरोना (Corona) काळात लॉकडाऊन (Lockdown) हा शब्द अनेकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या अर्थांनी एक अनुभव म्हणून जमा झाला. या काळामध्ये प्रत्येकाच्या हातात जे काही काम होतं ते थांबल्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या स्वतःच्या छंदाकडे आपले लक्ष केंद्रित केलं. रश्मी अनपट (Rashmi Anpat) हिने सहज म्हणून तिच्या टेरेसवर गार्डनिंगचा छंद जोपासला आणि गेल्या सात आठ महिन्यांमध्ये केलेल्या बागकामाला चांगलाच बहर आला आहे. नुकताच तीने लावलेल्या वेगवेगळ्या रोपांसोबतचा फोटो सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे. रश्मीच्या या बागकामाला त्याच्या चाहत्यांकडून कौतुकाची दाद मिळत आहे.

लॉकडाऊन मध्ये अनेक कलाकारांनी सक्तीची विश्रांती घेतली. या काळामध्ये त्यांची नेहमीची दगदगीची जीवन शैली थोडीशी विसावली. सुरुवातीला ही विश्रांती या कलाकारांना देखील खूप छान वाटली मात्र जसजसा लॉकडाउन वाढत गेला तसतसा मात्र या कलाकारांनी त्यांच्या छंदांना वाट मोकळी करून दिली होती. कुणी स्वयंपाक घरामध्ये रमत रेसिपी बनवल्या तर कोणी गाणं, चित्र तर कोणी मिमिक्री करत लॉक डाऊन मधला कंटाळवाणा दिवस मजेदार कसा बनवता येईल याचा विचार केला.

ही बातमी पण वाचा : तेजस्विनीची दुबई वारी जोरात

अभिनेत्री रश्मी अनपट हिला सुरुवातीपासूनच बागकामाची विशेष आवड होती. मात्र अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर तिला या सगळ्या कामासाठी तितकासा वेळ देता येत नव्हता. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रश्मी नेहमी तिच्या घराभोवती, टेरेसवर बागेमध्ये छोटी रोपं वेगवेगळ्या कुंड्यामध्ये लावत तिचा आनंद शोधत असायची. पाच सहा महिन्यांमध्ये ही रोपे चांगली फळाला आली आणि तिची टेरेस वरची बाग अधिक हिरवीगार झाली. रश्मी सांगते ,खरं तर कोरोना संसर्गाचा धोका होता त्या काळामध्ये प्रत्येकालाच निसर्गाचे महत्त्व कळालं.

स्वच्छतेकडे, आरोग्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण निसर्गाला जपलं नाही तर त्याचा पहिला धक्का हा आपल्या आयुष्यालाच कसा बसू शकतो हेदेखील प्रत्येकाला दाखवून दिलं. दरम्यानच्या काळात जेव्हा सगळीकडे लॉकडाउन होतं त्या वेळी प्रदूषण खूप कमी झालं होतं आणि म्हणूनच पर्यावरण संवर्धन म्हणजे नेमकं काय याचा खरा अर्थ माणसाला सापडला तो याच काळामध्ये. मला अनेकदा वाटायचं आपली छोटीशी बाग असावी. किमान टेरेसवर तरी आपल्याला बागकाम करता यावं आणि कामाच्या व्यापात या सगळ्या गोष्टी मागे पडल्या होत्या. पण आता मला ही हौस पूर्ण करता आली.

ही बातमी पण वाचा : राधिका सांगणार बालगोष्टी

असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकेतून रश्मीने तिच्या टीव्हीवरील अभिनयाला प्रारंभ केला. या मालिकेत तिचा अभिनय कौतुकास्पद ठरला होता. त्यानंतर पुढचे पाऊल, फ्रेशर्स या मालिकेमध्ये ही रश्मी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसली. सुवासिनी यासारख्या वेगळ्या धाटणीच्या मालिकेमध्ये तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. अमित खेडेकर सोबत तिचा विवाह झाला असून रश्मीला एक मुलगा देखील आहे. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांमध्ये संभाजीची भूमिका करणारा अमित आणि येसूबाईची भूमिका करणारी रश्मी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि खऱ्या आयुष्यात देखील ते संभाजी आणि येसूबाई प्रमाणेच सहजीवनाचे जोडीदार झाले.

अमित खेडेकर हादेखील अभिनेता असून त्याने हिरकणी या सिनेमा सोनाली कुलकर्णीच्या पतीची भूमिका साकारली होती. तसेच वेगवेगळ्या मालिकांमध्ये देखील तो दिसला आहे एकाच क्षेत्रात असल्यामुळे रश्मी आणि अमित यांचा नेहमी अभिनय, नवीन भूमिका, एखादी व्यक्तीरेखा याबाबत सतत चर्चा होत असते. सोशल मीडिया पेजवर सक्रिय असणाऱ्या कलाकारांमध्ये रश्मी देखील आहे. ती सतत तिचे वेगवेगळे फोटो, सणावारांच्या निमित्ताने केलेले वेगवेगळे घरगुती उपक्रम, शिवाय मुलासोबतचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. तिने तिच्या टेरेस गार्डन वर फुलवलेल्या बागकामाचा फोटो देखील शेअर केला. यावरून कलाकारांना जरा वेळ मिळाला तर त्यांचा छंद कशा पद्धतीने फुलू शकतो हेच रश्मीने दाखवून दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER