पूर्व विदर्भातील १४८ गावांना पुराचा तडाखा

Nagpur Flood

नागपूर : मागच्या आठवढ्यात विदर्भात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूर आले. पूर्व विदर्भातील १४८ गावांना पुराचा तडाखा बसला. सुमारे १८ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

पूरग्रस्तांसाठी विविध ठिकाणी छावण्या उघडण्यात आल्या आहे. ‘एनडीआरएफ’ची एक आणि ‘एसीआरएफ’च्या तीन तुकडय़ा व लष्कराची बचाव पथके लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम करत आहेत. आता पाऊस कमी झाला तरी धरणांमधील पाणी सोडल्याने काही भागात पाणी साचलेले आहे.

पूर्व विदर्भात शनिवारपासून पूरस्थिती आहे. नागपूर जिल्ह्य़ातील ५१, गडचिरोली जिल्ह्य़ातील ४, चंद्रपूर जिल्ह्य़ातील ६, भंडाऱ्यातील ५७ आणि गोंदियातील ३० अशा १४८ गावांतील २७,७२१ नागरिकांना पुराचा फटका बसला. गेल्या दोन दिवसांपासून पूरस्थिती असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोलीच्या उत्तर आणि दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात गावांमध्ये पाणी साचल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER