मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पूरपरिस्थिती

Flood situation in Ratnagiri district due to torrential rains

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरीत जिल्ह्यात काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वहायला लागल्या असून चिपळूणची वाशिष्ठी, शिवनदी, खेडची काजळी नदी, राजापूरची अर्जुना नदी यांची पात्रे पाण्याने तुडुंब भरली आहेत. चिपळूण व खेडमधील नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने येथील तालुका प्रशासनाने त्यांना पूर येण्याच्या दृष्टीने धोक्याचा ईशारा दिला आहे. या पावसामुळे रत्नागिरी शहरातील जयस्तंभ ते तेलीआळी तळ्याकडे जाणाऱ्या खारेघाट रोडवरील रस्त्याच्या साईडचा काही भाग खचला. नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी येऊन माती बाजूला केली. रत्नागिरी शहरातील केळेमजगाव येथील पवारवाडी, महामूरवाडी येथे धरण भरले असून रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER