धरणातील पाणी सोडून पूर नियंत्रण नियोजन

Kolhapur Dam

कोल्हापूर :- जिल्ह्यात गतवर्षी आलेल्या महापुरानंतर आता प्रशासन सजग झाले आहे. जलसंपदा विभागाने महापूर नियंत्रणाचे सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. यावर्षी जून महिन्यात पडलेल्या पावसाचे पाणी ना साठवता ते सोडले जाणार आहे. असे नियोजन 30 जुलैपर्यंत पडणाऱ्या पावसाचे पाणी धरणात न साठवता त्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात येणार आहे.

1 ते 30 जून अखेर पंचगंगा खोऱ्यातून 2.60 टीएमसीसह दूधगंगा-वारणा खोऱ्यातून एकूण पाच टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षी पाच ऑगस्टपासून महापुराची स्थिती निर्माण झाली होती. धरण ते राजापूर बंधारा या फ्रिकॅचमेट परिसरात झालेल्या पावसाने महापुराची स्थिती गंभीर बनली. महापुरास धरणातील पाण्याचा विसर्ग 25 टक्के आणि फ्रिकॅचमेंट एरियातील पावसाचे पाणी 85 टक्के जबाबदार असल्याचे आडेवारीवरून सिद्ध झाले आहे. यंदा धरणातून विसर्ग होणाऱ्या 20 टक्के पाण्याचे नियोजन 1 जूनपासूनच सुरू करण्यात आले आहे.

धरणातील पाणी कधी आणि किती सोडायचे, धरणात किती पाणी साठा ठेवायचा, याचा सूक्ष्म आराखडा तयार केला आहे. प्रत्येक धरणावर बिनतारी संदेश यंत्रणा मोबाईल यंत्रणेसह नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. आठवड्यातून दोनवेळा सर्व कार्यकारी अभियंत्यांची बैठक घेऊन धरणातील पाणी साठा आणि विसर्गाचे नियोजन याची महिती घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER