
मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊननंतर सुमारे दोन महिन्यानंतर आज प्रवासी विमान सेवा सुरू झाली मात्र, अनके उड्डाणे रद्द झाली पण प्रवाशांना त्याबाबत माहिती नसल्याने मुंबई, दिल्लीसह अनेक विमानतळांवर गोंधळ झाला.
ही बातमी पण वाचा:- दोन महिन्यांनतर आंतरदेशीय विमानसेवा सुरू..
पहिल्याच दिवशी दिल्लीला येणारी आणि दिल्ली येथून जाणारी एकूण ८२ उड्डाणे रद्द करण्यात आलीत. याबाबत प्रवाशाना माहिती देण्यात आली नव्हती. विमातळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक राज्यांनी केंद्राला कळवले की ते विमानसेवा सुरू करण्याच्या स्थितीत नाही त्यामुळे ती उड्डाणे रद्द करण्यात आलीत. दिल्ली विमानतळावरून आज १२५ विमाने उड्डाण करणार असून ११८ विमाने बाहेरून दिल्लीला येतील.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरही अशीच गोंधळाची स्थिती होती. उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशी विमानतळाबाहेर बसले होते. दिल्ली येथून पुण्यासाठी पहिले विमान आज पहाटे ४. ४५ वाजता उडाले तर मुंबई येथून पाटण्यासाठी पहिले विमान ६. ४५ वाजता उडाले. मुंबई हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ आहे. येथे रोज २५ विमाने येतात आणि २५ दुसऱ्या शहरांसाठी उड्डाण करतात.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला