महापालिकेच्या 47 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या 47 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजीरी लाटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापौरऍ़ड.सौ.सुरमंजीरी यांनी बोलताना शहरातील नागरीकांना जास्तीत जास्त प्रमाणात मुलभूत सेवा सुविधा उपलब्ध करुन देणेवर माझा भर राहणार असलेचे सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांनी काम करताना स्वत: कामाची उर्जा निर्माण केली पाहिजे त्याचे प्रतिबींब समाजात दिसावे, असे सांगितले.

यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, प्राथमिक शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे,विरोधी पक्षनेता विलास वास्कर, गटनेता सुनिल पाटील, नगरसेवक अशोक जाधव, शेखर कुसाळे, सुभाष बुचडे, अजित ठाणेकर, नगरसेविका सौ.उमा बनछोडे, सौ.माधूरी लाड, सौ.उमा इंगळे, सौ.इंदूमती माने, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, अग्निशमन दलाचे जवान, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थीनी, व्यायामशाळा प्रशिक्षक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.