नागपुरात महाविकास आघाडीचा झेंडा ; भाजपला धक्का

BJP - Mahavikas Aghadi

मुंबई :- नागपूर (Nagpur) पदवीधर निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला आहे. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी (Abhijeet Vanjari) यांनी भाजपचे संदीप जोशी (Sandeep Joshi) यांचा पराभव केला आहे.

अभिजित वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. त्यांनी ही आघाडी अंतिम फेरीपर्यंत कायम ठेवली आणि जोरदार मुसंडी मारत भाजपच्या गडाला मोठं खिंडार पाडले. भाजपचे संदीप जोशी यांच्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

दरम्यान अभिजित वंजारी यांना एकूण 55 हजार 947, संदीप जोशी यांना 41 हजार 540, अतुल कुमार खोब्रागडे यांना 8 हजार 499 तर निलेश कराळे यांना 6 हजार 889 मते मिळाली. त्यानुसार अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले.

ही बातमी पण वाचा : जनतेने भाजपला नाकारले, राज्याचं राजकीय चित्र बदलतंय – शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER