रास्ता दुरुस्त करा, अन्यथा जेसीबीने उखडेन; उदयनराजेंचा इशारा

Udayan Raje

वाई :- “पुणे – सातारा महामार्ग खराब झाला आहे तो ताबडतोब दुरुस्त करा, नाहीतर मी तो जेसीबीने उखडून टाकेन, असा इशारा उदयन राजेंनी (Udayan Raje) वाई पालिकेला दिला.

वाई पालिकेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उदयनराजेंनी वाईला बैठक घेतली. नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे, मुख्याधिकारी विद्या पोळ नगरसेविका रुपाली वनारसे विकास शिंदे. ऍड दत्ता बनकर आदी उपस्थित होते. राजे म्हणालेत – पुणे सातारा महामार्ग खराब झाल्याने रस्ते विकास महामंडळाला संबंधित ठेकेदाराचे काम काढून घेण्याबाबत कळविले आहे. रस्ता खराब झाल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. रस्ता लवकरच दुरुस्त झाला नाही तर मी स्वतः जेसीबी घेऊन रस्ता उघडून टाकणार आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेत मतदारांच्या हिताचा विचार करण्यात आलेला नाही, राजकीय सोयीच्या दृष्टीने पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे मतदारांचे फार मोठे नुकसान झाले. चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ तयार केल्यामुळे लोकप्रतिनिधींना मिळणारा निधी व मतदार संघाची मागणी यामध्ये फार मोठा फरक पडत आहे. लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. खासदारांना विकासनिधीत मिळतात पाच कोटी रुपये. विधानसभा मतदारसंघात तीन तालुके येतात व आमदारांना विकासकामांसाठी मिळतात दोन कोटी रुपये. मतदारसंघाची मागणी मोठी असल्यामुळे निधी अपुरा पडतो, अशी तक्रार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

“मुंबई पुणे दिल्ली बेंगलोर अहमदाबादसारख्या महानगरांमध्ये मोठ मोठ्या महापालिका असतात. त्यांचा स्वतःचा निधी व तेथील नगरसेवकांचा निधीही मोठा असतो. ग्रामीण भागामध्ये मतदारसंघ मोठे आणि निधी तोकडा पडत असल्याने विकास कामे करता येत नाहीत . यासाठी महानगरांमधील खासदार, आमदार निधी कमी करून तो देशाच्या ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना वाढवून दिल्यास ग्रामीण भागातील अडचणी सोडविता येतील, असे ते म्हणालेत.

ही बातमी पण वाचा : साताऱ्याच्या राजघराण्याचे शाही सीमोल्लंघन रद्द; उदयनराजेंचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER