पाच वर्षांनंतर कीर्ति कुल्हारीने घेतला घटस्फोट

Maharashtra Today

बॉलिवूडमध्ये (Bollywood) प्रेमात पडून लग्न करायला वेळ लागत नाही आणि लग्नानंतर काही वर्षांतच वेगळे व्हायलाही वेळ लागत नाही. बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांचे सेटवर प्रेम जमले, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही प्रेमी जोडपी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे आश्वासन देत लग्न करतात. पण लग्नानंतर लगेचच त्यांना आपण एकदुसऱ्यांसाठी बनलेले नसल्याचे समजते आणि नंतर वेगळे होण्याची प्रक्रिया सुरु होते. बॉलिवूडची अभिनेत्री कीर्ति कुल्हारी (Kirti Kulhari) नेही वैयक्तिक कारणांमुळे पती साहिल सहगल (Saahil Sehgal) सोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कीर्तिने सोशल मीडियावर पोस्ट टाकून या गोष्टीची माहिती दिली आहे.

कीर्ति कुल्हारीने २०१० मध्ये ‘खिचडी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यापूर्वी कीर्तिने ओडिया भाषेतील सिनेमा ‘धारिणी’मध्ये काम केले होते. त्यानंतर तिने ‘पिंक’, ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’, ‘इंदू सरकार’, ‘ब्लॅकमेल’ अशा काही हिट सिनेमांमध्येही काम केले आहे. जाहिरातीच्या शूटिंगच्या वेळी कीर्ति आणि साहिलची भेट झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि कीर्तिने साहिलला प्रपोज केले. त्यानंतर २०१६ मध्ये कीर्तिने साहिल सहगलशी लग्न केले होते. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांवर प्रेम करीत असल्याचे फोटो शेअर करीत ते दोघे एकमेकांच्या सहवासात किती आनंद आहेत हे दाखवत असत. मात्र असे असतानाही या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे.

कीर्ति कुल्हारीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की, मी आणि माझा पती साहिलने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हा निर्णय फक्त कागदावर नाही तर वास्तव जीवनात घेतला आहे. कोणाबरोबर तरी राहात असताना असा निर्णय घेणे फार कठिण आहे. जेव्हा दोन जण एकत्र राहात असतात तेव्हा सगळे तो क्षण साजरा करीत असतात, तुम्हीही त्या व्यक्तीवर प्रेम करता आणि त्याची काळजी करीत असता. त्यामुळेच तुम्ही जेव्हा वेगळे होण्याचा निर्णय घेता तेव्हा त्या सगळ्यांना खूप दुःख होते जे तुमच्या एकत्र येण्याने आनंदी झालेले असतात. हे सोपे नाही, पण हाच आमचा निर्णय आहे. असेही कीर्तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. कीर्तिने पुढे लिहिले आहे, ‘ज्यांना माझी काळजी आहे, त्यांना मी सांगू इच्छिते की, मी माझ्या जागेवर खरी असून जे माझ्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत त्यांनाही माझा निर्णय योग्य वाटेल आणि ते यावर कमेंट्स करणार नाहीत. तुमची कीर्ति कुल्हारी.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button