पिकनिकसाठी पुण्याजवळील पाच प्रसिद्ध वॉटर पार्क

diamond water park

पुणे :- सध्या शाळा आणि कॉलेजला सुट्ट्या असल्यामुळे प्रत्येक जण फिरायला जाण्याचा प्लॅन करणे अपेक्षितच आहे. मात्र तरीही उन्हाळ्याच्या या मोसमात वॉटर पार्कला पर्यटकांची जास्त पसंती आहे. पुण्यातील रहिवाशांसाठी पुरेसा वेळ नसल्याने फक्त एका दिवसात पुण्यातील पाच वॉटर पार्कला तुम्ही भेटी देऊ शकता. त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका वॉटरपार्क

अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका हे देशातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे वॉटर पार्क आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका मुंबई आणि पुण्यापासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. या वॉटर पार्कमध्ये १४ राईडस असून इथे लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वच वेगवेगळया राईडसचा आनंद लुटू शकतात. खालापूर टोल नाक्यापासून इमॅजिका वॉटर पार्क चार किलोमीटर अंतरावर आहे. डायमंड वॉटर पार्कची वेळ, शुल्क आणि अन्य सुविधांबद्दल तुम्ही डायमंड वॉटर पार्कच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकता.
सेंटोसा रिसॉर्ट वॉटर पार्क

एक दिवसाच्या सुटीसाठी तर पुणेकरांसाठी सेंटोसा रिसॉर्ट वॉटर पार्क उत्तम पर्याय आहे. वॉटर पार्क आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रावेतपासून एक किलोमीटर अंतरावर हे उत्तम वॉटर पार्क आहे. वेगवेगळया वॉटर स्लाईडस, स्विमिंग पूल आणि वेव्ह पूल या ठिकाणी असून अबालवुद्ध इथे पाण्यात खेळण्याचा आनंद लुटू शकता. पर्यटकांना इथे राहण्याचा सुद्धा पर्याय आहे.

Krishna Water Parkकृष्णाई वॉटर पार्क
पुण्यातील सिंहगड किल्ल्याजवळच्या दोनजी गावाजवळ असलेले कृष्णाई वॉटर पार्क पंधरा एकरमध्ये पसरलेले असून या वॉटर पार्कमध्ये तुम्ही वेगवेगळया राईडसचा आनंद लुटू शकता.

पानशेत वॉटर पार्क
अन्य वॉटरपार्कपेक्षा हा थोडया वेगळया पद्धतीचा पार्क म्हणेज पानशेत वॉटर पार्क. हा खडकवासला धरणाच्याजवळ आहे. आहे. इथे राईडस कमी आहेत पण स्पीड बोटिंग, वॉटर स्कूटर्स अशा वॉटर स्पोटर्सचा पर्याय आहे. याच गोष्टींमुळे हा वॉटर पार्क वेगळा ठरतो.

डायमंड वॉटर पार्क
पुण्याच्या लोहगाव परिसरात डायमंड वॉटर पार्क असून इथे तुम्ही वेगवेगळया २८ राईडसचा आनंद लुटू शकता. वेव्ह पूल, रेन डान्स, फॅमिली पूल, लेझी रिव्हर आणि हनी बनी असे मनोरंजनाचे वेगवेगळे पर्याय तुम्हाला या वॉटर पार्कमध्ये मिळतील. इथे पर्यटकांच्या सुरक्षेला पहिले प्राधान्य असून जीवरक्षक पूर्णवेळ तैनात असतात.

अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका वॉटरपार्कची वेळ, शुल्क आणि अन्य सुविधांबद्दल तुम्ही इमॅजिका वॉटरपार्कच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकता. तर वॉटर पार्कच्या स्थळीही सर्व प्रकारची माहिती मिळू शकते.

ही बातमी पण वाचा : राजीव गांधींची लक्षद्वीप सहल आर. के. लक्ष्मण यांच्या नजरेतून…