मास्क न वापरणाऱ्यांना पाच हजार दंड करा : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

कोल्हापूर : मास्क न वापरणाऱ्यांकडून पाच हजार दंडाची आकारणी करावी. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याबाबत पुढाकार घेऊन पोलिसी खाक्या दाखवला पाहिजे. ई -पास सवलत, लाॅकडाऊन, गणेश उत्सव बंदोबस्त नसल्याने पोलिसांनी या कामामध्ये लक्ष घालावे. प्रशासनाने कोणाचीही फिकीर न करता, कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी या गोष्टी केल्याच पाहिजेत, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे केली. संसर्गामुळे होणाऱ्या कोरोनाबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

लक्षणे आढळल्यानंतर स्वॅब चाचणीचा अहवाल येण्यास किमान दोन दिवस लागतात. अशा लोकांकडून संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाने अहवाल येईपर्यंत अशांना घरीच थांबविण्याचे आदेश करावेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष केल्यानेच त्याचे परिणाम भोगत आहोत, असे पत्रकात मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER