पंकजा मुंडे यांच्या भूमिकेला पाच ऊस तोडणी कामगार संघटनांचा विरोध

Pankaja Munde

पुणे :- माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आंबेजोगाईच्या मेळाव्यात 21 रुपये प्रति टन वाढ द्या अशी भूमिका घेवून ऊस तोडणी कामगार, मुकादम यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. पंकजा मुंडेंची ही भूमिका म्हणजे ऊसतोड कामगारांची घोर फसवणूक आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) या ऊसतोड कामगारांच्या नेत्या नाहीत तर त्या स्वतः साखर कारखानदार आहेत, अशी टीका महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष डी. एल. कराड यांनी केली आहे.

कराड यांनी पत्रकात म्हटले आहे की, कनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा वारसा त्यांनी सोडून दिलेला आहे. आज मुंडेसाहेब हयात असते तर त्यांनी पंकजा मुंडे यांचा समाचार घेतला असता.मागच्या कराराच्या वेळीही त्यांनी ऊस तोड कामगार ,मुकादमाची फसवणूक केली व आताही ऊसतोड कामगारांच्या मुळावर त्या उठल्या आहेत.सात पैकी पाच ऊसतोडणी कामगार संघटनांनी लवादाला विरोध केला आहे. तशा आशयाचे लेखी पत्र राज्य सहकारी साखर संघाला पाठवले आहे.याउपरही लवादा मार्फत निर्णय लादल्यास त्याचे तीव्र परिणाम होतील हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो.

पंकजा मुंडे यांनी घेतलेली भूमिका कुठल्याही ऊसतोडणी कामगार संघटनेला मान्य नाही . त्यांनी कुठल्याही संघटनेशी चर्चा केलेली नाही व त्यांना असा निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही.पंकजा मुंडे ह्या साखर कारखानदारांच्या हातातील बाहुले बनल्या आहेत हेच यावरून सिद्ध होते .

सीटूप्रणित महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना व अन्य पाच संघटना संप सुरूच ठेवतील .27 तारखेच्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा आम्ही देत आहोत.
असे कराड यांनी म्हटले आहे.

पत्रकावर प्राध्यापक सुभाष जाधव सरचिटणीस, महाराष्ट्र ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटना .

दत्ता डाके, बीड,जिल्हाअध्यक्ष, सय्यद रज्जाक .

बीड,जिल्हा सेक्रेटरी, बळीराम भुम्बे, मोहन जाधव आदींच्या सह्या आहेत.

ही बातमी पण वाचा : माझ्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका; निर्णय घेण्यास मी खंबीर – पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER