पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर; आजपासून प्रचाराचा धडाका

Election
  • पश्चिम बंगाल, आसाममध्ये २७ मार्चपासून, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीत ६ एप्रिल रोजी मतदान

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चपासून मतदान सुरू होणार आहे व २८ एप्रिलला पश्चिम बंगालमधील आठव्या फेरीच्या मतदानाने मतदान संपेल. सर्व राज्यांची मतमोजणी २ मे रोजी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आसाममध्ये तीन तर पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत  मतदान होईल. केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीत ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. आसाममध्ये तीन  व पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत निवडणुका होणार आहेत.

केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूत प्रत्येकी एका टप्प्यात मतदान होणार असून या पाचही राज्यांत २ मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे, असे ते म्हणालेत. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पाच राज्यांतील  निवडणुका या अत्यंत आव्हानात्मक आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात या निवडणुका होत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून आपल्याला नव्या गोष्टींचा अवलंब करावा लागणार आहे. निवडणूक अधिकारी-कर्मचारीही कोरोना योद्ध्यांसारखे काम करणार आहेत, असे सुनील अरोरा यांनी सांगितले. केरळ, तामिळनाडू व  पुद्दुचेरीत  एका टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान होईल.

आसाम : तीन टप्प्यांत

आसाममध्ये तीन टप्प्यांत निडणुका होतील. पहिल्या टप्प्यात २७ मार्च, दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल आणि तिसऱ्या टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान होईल.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २७ मार्च, दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल, तिसऱ्या टप्प्यात ६ एप्रिल, चौथ्या टप्प्यात १० एप्रिल, पाचव्या टप्प्यात १७ एप्रिल, सहाव्या टप्प्यात २२ एप्रिल, सातव्या टप्प्यात २६ एप्रिल आणि सातव्या टप्प्यात २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER