पंचतारांकित हॉटेलचे रुग्णालयात रुपांतर; मुंबई महापालिकेचे मोठे पाऊल

Hospital - Maharastra Today
Hospital - Maharastra Today

मुंबई :- मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोना स्थिती विदारक होत चालली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना संख्या नियंत्रणात यावी, यासाठी पालिकेकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे. आता रुग्णांच्या उपचारासाठी पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जाणार आहे. याबाबतचे मुंबई महापालिकेने परिपत्रक जारी केले आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या उपचारासाठी आता पंचतारांकित हॉटेलचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे आता खासगी रुग्णालय रुग्णांच्या उपचारासाठी ४ किंवा ५ स्टार हॉटेलचा वापर करणार आहे. ज्या रुग्णांना बेडची सर्वाधिक गरज आहे, त्यांना बेड उपलब्ध होईल.

तसेच, ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षण नाहीत, अश्यांना हॉटेलमध्ये पाठवण्यात येईल. त्यांच्यावर हॉटेलमध्ये उपचार केले जातील. याबाबत लवकरच खासगी रुग्णालय हॉटेलसोबत करार करणार आहे. या सगळ्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी मुंबईच्या २४ वॉर्डांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

मुंबईत कोणकोणत्या हॉटेलचे रुग्णालयात रुपांतर

  1. बॉम्बे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या स्टेप डाऊन फॅसिलीटीसाठी मरिन ड्राईव्ह येथील InterContinental हॉटेल बुक केले आहे.
  2. तर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलसाठी बिकेसी येथील ट्रायडेंट हॉटेल बुक केले आहे.
  3. स्टेप डाऊन फॅसिलीटी दिलेल्या हॉटेल्समध्ये पेशंटसोबत नातेवाईकांना रहायचे असेल तर त्यांना ट्विन रूम बुक करावे लागेल.
  4. स्टेप डाऊन फॅसिलीटीच्या रुग्णांसाठी दर दिवसाला ४ हजार रुपय शुल्क आकारले जाईल.
  5. तसेच ट्विन रूम फॅसिलीटीसाठी ६ हजार रुपये आकारले जाईल.
  6. ज्या हॉटेल्समध्ये किमान २० खोल्या असतील, तेच हॉटेल स्टेप डाऊन फॅसिलीटी म्हणून खाजगी हॉस्पिटल वापरू शकेल.
  7. हॉटेलमधील डॉक्टरांची वेळोवेळी भेट, इतर औषधे आणि वैद्यकिय गरज पुरवणे, ही हॉस्पिटलची जबाबदारी असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button