सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच पॉझिटिव्ह, एकूण संख्या 24

रत्नागिरी(प्रतिनिधी) :  सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजच्या दिवसात दुसरा धक्का बसला आहे. सकाळी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर आता पुन्हा पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसभरात सात रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २४ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाऴी आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात १७ वा रुग्ण आढळलेल्या पणदूर ता. कुडाळ येथील रुग्णाच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती कणकवली तालुक्यातील आहे. त्याचे आहवाल आज पॉजिटिव्ह आले आहेत. तर वैभववाडी तालुक्यातील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आली आहे. दोन्ही रुग्णानी मुंबई येथून प्रवास केला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींचा आकडा १९ झाला होता. मात्र यातील ७ कोरोना मुक्त झाल्याने एक्टिव्ह रुग्ण केवळ १२ आहेत.दिवसभरात सात रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २४ झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER