पाच वाहनांच्या भीषण अपघातात  पाच जण ठार

  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील दुर्घटना

Five people were killed in a horrific accident involving five vehicles

मुंबई :- मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai-Pune Expressway) मार्गावर फूड मॉलसमोर पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने  पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जण ठार (5 Die) झाले.

हा अपघात मध्यरात्रीनंतर १ च्या सुमारास घडला. कंटेनरची धडक इतकी जबरदस्त होती की 45 वाहने अक्षरशा चिरडली गेली. क्रेटा, इनोवा, ट्रेलर, ट्रक अशा पाच वाहनांचा अपघात झाला.चार मृतदेह खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात आणण्यात आले आहेत तर एका जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाला.

भूतानमध्ये मंजू प्रकाश नाहर, वय ५८, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम, डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय ४१, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु. महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई, सौ. उषा वसंत झुंझारे, वय ६३, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,सौ. वैशाली वैभव झुंझारे, वय ३८, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई, कु.श्रिया वैभव झुंझारे, वय-५, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई, यांचा समावेशआहे.

जखमींमध्ये स्वप्नील सोनाजी कांबळे, ३० वर्षे, रा. फ्लॅट नं. २०१, इंद्रपुरी, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव (पश्चिम) प्रकाश हेमराज नाहर, वय-६५, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम, कु.अर्णव वैभव झुंझारे, वय-११, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई, किशन चौधरी, काळूराम जमनाजी जाट यांचा समावेश आहे. त्यापैकी किशन चौधरी आणि काळूराम जाट यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतुकीचा तीन तास खोळंबा झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER