गडचिरोलीत सी-60 कमांडोंकडून पाच माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोलीत सी-60 कमांडोंकडून पाच माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील कसनेलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे.

उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात मा.पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया सो व पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल सी-60 जवानांनी (C-60 Commando) नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.

यामध्ये ५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी-60 जवानांना यश आले. घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. कसनेलीच्या जंगलात सी-60 कमांडो आणि माओवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या वर्षातील माओवाद्यांच्या विरोधातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER