राजकुमार यशराजराजेंच्या वाढदिवसानिमित्त शाहू महाराज यांच्याकडून रुग्णालयास पाच लाखांचा जनरेटर

Five lakh generator to the hospital from Shahu Maharaj

कोल्हापूर : कोल्हापूरात (Kolhapur) कोरोनाचा संसर्ग (Corona Virus) वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी त्यांचे नातू राजकुमार यशराजराजे छत्रपतीं यांच्या वाढदिवसानिमित्त आयसोलेशन येथे नव्याने स्थापन केलेल्या कोव्हीड केअर सेंटरसाठी (Covid Care Center) पाच लाखाचा जनरेटर देण्याचे जाहिर केले.

माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांचे चिरंजिव राजकुमार यशराजराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा न करता त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसाठी एक हजार सॅनिटायझर बॉटल्स, एक हजार मास्क, पाचशे फेसशिल्ड, 258 पीपीई किट आणि 50 गाऊन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे आज सुपूर्द केले.

न्यू पॅलेस येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास श्रीमंत छत्रपती शाहु महाराज, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती, महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक अर्जुन माने, राजाराम गायकवाड, रत्नेश शिरोळकर, उपस्थित होते.

यावेळी श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी कोल्हापूर शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्याबाबत महापालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणखीन काही मदत आवश्यक असल्यास तात्काळ उपलबध करुन देऊ, अशी ग्वाही दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER