लक्झरी बसची गॅस टँकरला धडक; पाच जणांचा होरपळून मृत्यू

लक्झरी बस गॅस टँकरवर धडल्यामुळे भीषण अपघात,

धुळे : धुळे तालुक्यातील अजंग गावाजवळ भरधाव लक्झरी बस गॅस टँकरवर धडकल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील अजंग गावाजवळ सूरत-नागपूर महामार्गावर लक्झरी बस आणि गॅस टँकरचा भीषण अपघात झाला.

या दरम्यान, बस गॅस टँकरला धडकल्यामुळे दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या घटनेत बसमधील दोघे तर गॅस टँकरचालकाचा आणि इतर दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान, बसमध्ये अजून प्रवासी होते का, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पण, बसमध्ये प्रवासी असल्यास मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेत दोन्ही वाहने खाक झाली. अपघातामुळे सूरत-नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मनपाच्या बंबमुळे आगीवर नियंत्रण मिळविता आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला