महाराष्ट्रात पाचशे तर देशभरात पंधराशे कोटी ऊस बिल थकीत

Sugarcane bill

नवी दिल्ली :- साखरेचे अतिरिक्त उत्पादन, साखरेच्या किमतीतील घसरण यामुळे साखर कारखान्यांच्या आर्थिक तरलतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे 30 सप्टेंबर 2020 अखेर संपणाऱ्या साखर वर्षाअखेर देशातील साखर कारखान्यांकडील 15 हजार 587 कोटी रुपयांची ऊस बिले थकली आहेत. महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांची 511 कोटी रुपयांची ऊस बिले थकलेली आहेत.

30 सप्टेंबर 2020 ला संपलेल्या साखर वर्षातील 12 हजार 994 कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहे. 1 हजार 899 कोटी रुपयांची थकबाकी 2016-17 या हंगामातील आहे. 242 कोटी रुपयांची थकबाकी 2017-18 च्या हंगामातील आहे. 548 कोटी रुपयांची थकबाकी 18-19च्या हंगामातील आहे. उत्तर प्रदेश थकबाकीत प्रथम क्रमांकावर आहे.

राज्यनिहाय ऊस बिलांची थकबाकी पुढीलप्रमाणे. (प्रथम एकूण थकबाकी कोटीत व कंसात 2019-20 ची थकबाकी कोटी रुपये ) उत्तर प्रदेश 10,174 ( 10,000), तमिळनाडू 1834 (230), गुजरात 924 (863), उत्तराखंड 642 (434), महाराष्ट्र 511 (126), हरयाणा 433 (433), बिहार 347 (244), पंजाब 359 (340), आंध- प्रदेश 86 (47), तेलंगणा 15 (15), कर्नाटक 232 ( 185 ), छत्तीसगड 65 (57), पाँडिचेरी 21 (00), ओडिशा 03 (00), मध्य प्रदेश 35 (20) गोवा 02 (00) ऑल इंडिया थकबाकी 15,683 (12994).

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER