औरंगाबादेत पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळणारे पाच जण जेरबंद

Arrest

औरंगाबाद : उघड्या पत्र्याच्या शेड मध्ये पत्त्यांवर पैसे लावुन झन्नामन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या सलमान खान मोहम्मद खान, अर्शर शेख अब्दुल, जावेद खान, अनिल जाधव व मुकर्रम अशा पाच जणांना पोलिसांनी छापा टाकून पकडले. त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कमेसह १६ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जमादार पंढरीनाथ जायभाय यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार अकोले करत आहेत.