पाच दिवसांचा आठवडा : २ मार्चला उच्च न्यायालयात सुनावणी

Bombay High Court

सोलापूर : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यासाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. उद्या २९ फेब्रुवारीपासून (शनिवारी) त्याची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

कोरोनासाठी राज्यात आपात्कालीन रुग्णालये उभारा : अतुल शहा

आता २ मार्च रोजी (सोमवारी) या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मनोज गाडेकर असे याचिकाकर्त्याचे नाव असून, सवंग लोकप्रियतेसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. गाडेकर यांनी जनहित याचिका दाखल करीत हे आव्हान दिले आहे.