शिवाजी विद्यापीठात पाच दिवसांचा आठवडा

Shivaji University

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ (Shivaji University) प्रशासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागास माहिती पाठवली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून याबाबत विविध संघटनांनी मागणी केली आहे. त्याअनुषंगाने नियोजन सुरू झाले आहे.

राज्याचे उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांकडून याबाबतची माहिती मागविली आहे. त्यानुसार विद्यापीठाने पाच दिवसांचा आठवडा करण्याची माहिती पाठविली आहे. यात पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजावर होणार परिणाम, शिक्षकांचे वर्कलोड याची माहिती सादर करण्यात आली आहे. ‘एसईबीसी’ अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला याची माहिती मागविण्यात आली होती. ती विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर पाठविण्यात येणार असल्याचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER