तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांवर कारवाई

Arrested

औरंगाबाद : शिवजयंती उत्सवादरम्यान शहरातील विविध भागांत काही तरुण हातात तलवार घेऊन रस्त्यावर उतरले होते. क्रांती चौक व पुंडलिकनगर पोलिसांनी हातात तलवार घेऊन छायाचित्र काढून दहशत निर्माण करणाऱ्या एकूण पाच जणांना ताब्यात घेतले अाहे.

क्रांती चौक परिसरात निरीक्षक उत्तम मुळक, अमोल देवकर पथकासह बंदोबस्तावर असताना त्यांना प्रल्हाद काशीनाथ पवने (३०, रा. भारतनगर) हा हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच त्याला अटक केली. राजेश भानुदास कोलते (२६, रा.एन १ सिडको) याला व एका अल्पवयीन मुलाला कोयता व गुप्ती बाळगताना अटक केली. सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक महादेव गायकवाड, नसीम खान, सय्यद सलीम, मनोज चव्हाण, राजेश फिरंगे, देवानंद मरसाळे, संतोष रेड्डी, मंगेश मनोरे आणि राजेश चव्हाण यांनी ही कारवाई केली.

मिरवणुकीत झेंडा न दिल्याने छातीत चाकू खुपसला, हल्लेखाेराची कबुली

तलवार घेऊन नाचणाऱ्या दाेघांना अटक : शिवाजीनगर भागातील मिरवणुकीत कुख्यात गुन्हेगार आणि हद्दपार आरोपी पवन ईश्वरलाल जैस्वाल (२०, रा. शिवाजीनगर) हा हातात तलवार घेऊन नाचत होता, तर पटीयाला बँकेजवळ मिरवणुकीत संदीप दगडुबा देशमुख (२०, रा. भारतनगर) हा हातात तलवार घेऊन नाचत होता. दोघांना अटक करत तलवारी जप्त करण्यात आल्या. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, रमेश सांगळे, विष्णू मुंढे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, दीपक जाधव, जालिंदर मांटे, रवी जाधव, निखिल खराडकर, प्रवीण मुळे यांनी ही कारवाई केली.