वडाळा टी टी पोलीस ठाण्यातील कोठडी मृत्यूप्रकरणी पाच पोलीस निलंबीत

मुंबई : वडाळा टी टी पोलीस ठाण्यात झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दोन अधिकार्‍यांसह एकूण पाच जणांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत असून गुन्हेशाखेने घटनास्थळावरील महत्वाचे पुरावे तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.

मारहाण प्रकरणात रविवारी रात्री वडाळा टी टी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या विजय सिंह (26) या तरुणाचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीतच सिंग याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटूंबियांसह नातेवाईकांनी केल्याने याप्रकरणी कोठडी मृत्यूची नोंद करत गुन्हेशाखेकडून तपास सुरु करण्यात आला आहे. घटनेवेळी कर्तव्यवावर हजर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सलीम खान, पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम, पोलीस हवालदार भाबल, पोलीस नाईक चौरे आणि पोलीस शिपाई चोले यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.