तंदुरुस्त कपिल देव आपल्या ‘फॕमिली 83’ ला भेटण्यास उत्सुक

Kapil Dev

महान अष्टपैलू विश्वविजेते कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी आपल्याला शुभेच्छा देणाऱ्यांना आणि आपल्या प्रकृतीबद्दल काळजी करणाऱ्या सर्वांना धन्यवाद देणारा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर जारी केला आहे. त्यात ते अगदी तंदुरुस्त दिसत असून त्यांना असे स्वस्थ बघून त्यांच्या असंख्य चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यासोबतच कपिल ‘पाजी’ यांना दीर्घायू होण्याच्या व उत्तम आयुरारोग्य लाभण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कपिल देव यांना गेल्या आठवड्यात हृदयविकाराचा त्रास झाला हौता आणि त्यांच्यावर अँजिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली होती. तीन दिवस दवाखान्यात राहिल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली होती. त्यानंतर तीन दिवसांनी कपिल देव यांचा हा व्हिडिओ संदेश आला आहे.

त्यात त्यांनी म्हटलेय की, माय फॕमिली …83..मोसम सुहाना है, दिलकश जमाना है! क्या कहें, बहोत दिल कर रहा है आप सब को मिलने का..अब बहोत अच्छा फिल कर रहा हूँ! थँक यू फॉर योर विशेस वन्स अगेन…अँड योर कन्सर्न..उम्मीद करते है की जल्दी से जल्दी मिलेंगे! आय डोंट नो की मुव्ही कब रिलीज होगी…लेकिन हम कोशीश करेंगे जल्दी से जल्दी मिलने की…ये साल का अंत आने को है…लेकिन..शुरुआत और भी बेहतर होगी…लव्ह यू आॕल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER