मासेमारांना समुद्रात लागली लॉटरी, एकाच माशानं कमावून दिले आठ लाख रुपये!

Maharashtra Today

पाकिस्तानातून स्वतंत्र होण्यासाठी वारंवार बलुचिस्तानमधून आवाज बुलंद होत असतो. पाकिस्तान तिथल्या नागरिकांचा मानवाधिकारांची गळचेपी करत असल्याच्या अनेक बातम्या येत असतात. अशा परिस्थीतीत बलुचिस्तानमधून आणखी एक बातमी समोर आलीये. यावेळी ही बातमी एका माशाची आहे. हा काय साधारण मासा नाही या माशाला खरेदी करण्यासाठी तब्बल आठ लाखांची (8 Lakh) बोली लावण्यात आली होती.

बलुचिस्तानमधील समुद्राकाठचा ग्वादर जिल्ह्यातल्या अब्दूल हक या मच्छिमाराला समुद्रात लॉटरी (Fishermen won the lottery) लागली. त्यानं आणि त्याच्या साथिदारांनी मासेमारी करताना एक मासा पकडला. तो सापडला आणि त्यांना याचा इतका आनंद झाला की फक्त नाचणं बाकी होतं. हा मासा वजन आणि उंचीन इतरांसारखा होता. इतकाही मोठा नव्हता. तरीपण तो मौल्यवान का? ठरला असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल. कारण तो मासा पकडण्यासाठी जळपास २ महिने सारे मच्छिमार कामाला लागले होते. २६ किलोच्या माशाची विक्री एकूण ७ लाख ८० हजारांना करण्यात आली.

कसा पकडला मासा?

अब्दल हक याने पकडलेल्या माशाचं नाव आहे, ‘क्रोकर’ उर्दूत सांगायचं तर ‘सवा’ आणि बलुची भाषेत ‘कूर.’ जीवानी भागातल्या समुद्रा काठावर हा मासा पकडण्यात आल्याचं कळतं. इराणच्या सीमेपासून फक्त १७ किलोमीटर दुर असलेला हा भाग आहे. तब्बल दोन महिने या माशाला पकडण्यासाठी खर्ची घालायला लागले. इतर मासे पकडत असताना अचानक जाळ्यात हा मासा त्यांना दिसला. विक्रीवेळी यातून भरपूर पैसा मिळेल अशी त्यांना आशा होती आणि घडलं ही तसंच तब्बल ३० हजार रुपये प्रतिकिलो अशी बोली मासा खरेदी करताना लावण्यात आली. म्हणून एकूण २६ किलो वजनाचा हा मासा ७ लाख ८० हजार रुपयांना विकण्यात आला.

का लागते लाखांच्या घरात बोली?

समुद्रात वेगवेगळ्या प्रजातीचे मासे सापडतात. त्यात ज्याचं वजन जास्त त्याला दर जास्त असा बाजाराचा नियम आहे. पण क्रोकरच्या बाबतीत ही गोष्ट धोडी वेगळी आहे. याला कारण आहे माशांच ‘एअर ब्लॅडर’ म्हणजे हवा भरल्यामुळं मासा पोहतो. त्यामुळं याची किंमत इतर माशांपेक्षा जास्त असते. चीन, जपान आणि युरोपात या माशाला मागणी जास्त असते. माशामधल्या एअर ब्लेडरचा उपयोग माणसाची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला टाके लावण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे हृदयशस्त्रक्रिया करताना याचा अधिक वापर होतो. हृदय हा शरिरातला सर्वात नाजूक भाग आहे. त्याला टाके घालण्यासाठी लागणारी सामग्री सुद्धा सुव्यवस्थीत लागते. यातली एखादी चुकही महागात पडू शकते. यामुळं शक्यती सर्व काळजी घेण्याकडं डॉक्टरांचा कल असतो. शस्त्रक्रियेनंतर हृदयाला टाके घालण्याच्या प्रक्रियेत काही कमी जास्त झालं तर जीवाची भीती असते त्यामुळं हृदयाच्या शस्त्रक्रियेत टाके घालण्यासाठी या माशांचा एअर ब्लॅडरचा उपयोग केला जातो.

कसा पकडतात मासा?

बलुचिस्तानच्या किनारपट्टीवर आढळणाऱ्या माशाचं नाव ‘क्रुर’ असं ठेवण्यात आलंय. याला कारण म्हणजे त्याचा आवाज. हा मासा क्रुर, क्रुर असा आवाज करतो असं मासेमार सांगतात. समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या झाडांच्या कापारीत या प्रजातीची मादा मासा अंडी घालते. अनुभवी मच्छीमारांना हा मासा किनाऱ्यावर आला की त्याचा आवाज कानावर पडतो त्यामुळं ते लगेच जाळं फेकतात. यानंतर बराच वेळ तो मासा आवाज करतो आणि नंतर आवाज बंद होतो. यासाठी किमान दोन ते तीन तास लागतात. यानंतर जाळं वर ओढळं जातं आणि समुद्रातली लॉटरी हाती लागते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button