आयपीएलमध्ये सर्वप्रथम काय व कधी?

IPL

आयपीएलच्या (IPL) नव्या सत्राला सुरुवात होत आहे. 2008 पासून आतापर्यंत आयपीएलची बारा सत्र झाली आहेत. यावेळी पहिल्यांदाचा आयपीएलचे सर्वच्या सर्व सामने युएईमध्ये (UAE) खेळले जाणार आहेत. पहिल्यांदाच सामने प्रेक्षकांविना होणार आहेत आणि पहिल्यांदाच अंतिम सामना रविवारऐवजी इतर दिवशी होणार आहे आणि पहिल्यांदाच स्पर्धेला सुरुवात सप्टेंबरमध्ये होणार असून नोव्हेंबरपर्यंत सामने चालणार आहेत.

याप्रकारे आयपीएलच्या या इतिहासात सर्वप्रथम (FIRST) घडलेल्या इतर घटना अशा…

पहिला सामना- 18 एप्रिल 2008- राॕयल चॕलेंजर्स बंगलोर वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगलोर

पहिली नाणेफेक- राॕयल चॕलेंजर्स बंगलोर (राहुल द्रविड)- क्षेत्ररक्षण

पहिला चेंडू- गोलंदाज प्रवीण कुमार (आरसीबी), फलंदाज सौरव गांगुली (केकेआर)

पहिली धाव- लेग बाय – पहिलाच चेंडू

बॕटीने पहिली धाव- ब्रेंडन मॕक्क्युलम (केकेआर)चा झहिर खानला चौकार- सामन्यातला आठवा चेंडू

पहिला चौकार- ब्रेंडन मॕक्क्युलम (केकेआर)

पहिला षटकार- ब्रेंडन मॕक्क्युलम (केकेआर) सामन्यातील 10 वा चेंडू, गोलंदाज झहीर खान

बाद झालेला पहिला फलंदाज – सौरव गांगुली (केकेआर) झे. कॕलिस गो. झहीर 5.2 षटकं, धावा एक बाद 61

पहिले अर्धशतक – ब्रेंडन मॕक्क्युलम (केकेआर) -32 चेंडू

पहिले शतक- ब्रेंडन मॕक्क्युलम (केकेआर)- पहिलाच सामना वि. आरसीबी- 53 चेंडू , 8 चौकार व 7 षटकार

पहिल्या दीडशे धावा- ब्रेंडन मॕक्क्युलम (केकेआर)- पहिलाच सामना वि. आरसीबी- 70 चेंडू, 10 चौकार व 12 षटकार

पहिले शून्य – भालचंद्र अखील (आरसीबी) वि. केकेआर- पहिला सामना – झे.पोंटींग गो.आगरकर

पहिला पहिल्याच चेंडूवर बाद- चमिंडा वास (डेक्कन चार्जर्स वि.कोलकाता नाईट रायडर्स) – चौथा सामना-.झे. गांगुली गो. आगरकर- 20 एप्रिल, 2008

पहिला चेंडू न खेळताच शून्यावर बाद – प्रज्ञान ओझा (डेक्कन चार्जर्स वि. कोलकाता नाईट रायडर्स) धावबाद- 20 एप्रिल 2008

पहिली फ्री हिट – मॕथ्थ्यु हेडेन (चेन्नई सुपर किंग्ज वि. किंग्ज इलेव्हन पंजाब)-.गोलंदाज ब्रेट ली. हेडनची दांडी उडाली होती पण फ्री हिट असाल्याने बचावला. 19 एप्रिल 2008

पहिली शतकी भागिदारी- गौतम गंभीर व शिखर धवन- दुसरी विकेट (दिल्ली डेअरडेवील्स वि. राजस्थान राॕयल्स) 19 एप्रिल,2008

पहिली द्विशतकी भागिदारी – अॕडम गिलख्रिस्ट व शाॕन मार्श (दुसरी विकेट- किंग्ज इलेव्हन पंजाब वि. राॕयल चॕलेंजर्स बंगलोर) – 17 मे 2011

पहिला रिटायर हर्ट फलंदाज- डॉमिनिक थॉर्नर्ली (मुंबई इंडीयन्स वि. राॕयल चॕलेंजर्स बंगलोर) 20 एप्रिल,2008

पहिले निर्धाव षटक – ग्लेन मॕकग्रा (दिल्ली डेअरडेविल्स वि. राजस्थान राॕयल्स) 2008

पहिल्यांदा 4 किंवा 5 विकेट – सोहेल तन्वीर (6/14) राजस्थान राॕयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज, जयपूर, 4 मे 2008

पहिली हॕट्ट्रिक – लक्ष्मीपती बालाजी (चेन्नई सुपर किंग्ज) वि. किंग्ज इलेव्हन पंजाब, चेन्नई , 10 मे 2008

पहिला झेल- जेकस् कॕलिसने घेतला सौरव गांगुलीचा (राॕयल चॕलेंजर्स बंगलोर वि. कोलकाता नाईट रायडर्स) पहिला सामना 2008

पहिला धावबाद- अजीत आगरकर व वृध्दिमान साहा यांनी आरसीबीच्या अॕशली नोफ्केला धावबाद केले. (केकेआर वि. आरसीबी)

पहिला धावबाद एकट्याने – झहीर खानने सनथ जयसुर्याला बाद केले. पाचवा सामना 2008 (आरसीबी वि. मुंबई इंडियन्स)

पहिले सुपर ओव्हर- 23 एप्रिल 2009 – कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान राॕयल्स – केपटाऊन, राजस्थान राॕयल्स विजयी

पहिले विजेते- राजस्थान राॕयल्स (शेन वाॕर्न) वि. चेन्न्ई सुपर किंग्ज- 3 विकेट – नवी मुंबई 2008

पहिला सामनावीर – ब्रेंडन मॕक्क्युलम (केकेआर)

पहिला प्लेयर,आॕफ टुर्नामेंट – शेन वाॕटसन

पहिली आॕरेंज कॕप – शाॕन मार्श

पहिली पर्पल कॕप – सोहेल तन्वीर

पहिला रायझींग स्टार- श्रीवत्स गोस्वामी (आरसीबी)

पहिला फेअरप्ले अॕवार्ड – चेन्नई सुपर किंग्ज

परदेशातील पहिला सामना – न्युलँडस, केपटाऊन 18 एप्रिल 2009 – मुंबई वि. चेन्नई

युएईतील पहिला सामना – 16 एप्रिल 2014- अबूधाबी- कोलकाता वि. मुंबई

ही बातमी पण वाचा : IPL इतिहास: आतापर्यंत या संघांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत केला आहे प्रवेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER