बिहारच्या निवडणुकीत एमआयएमला पहिले यश

- किशनगंजची पोटनिवडणुक जिंकली

asaduddin-owaisi_20190274116

असुदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने बिहारमध्ये किशनगंज या मतदारसंघातली पोटनिवडणुक जिंकली. एमआयएमला बिहारमध्ये निवडणुकीत पहिल्यांदा यश मिळाले आहे.


पाटणा : असुदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने बिहारमध्ये किशनगंज या मतदारसंघातली पोटनिवडणुक जिंकली. एमआयएमला बिहारमध्ये निवडणुकीत पहिल्यांदा यश मिळाले आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसोबतच बिहारमध्ये ही पोटनिवडणूक घेण्यात आली. यात एमआयएमचे कमरूल होदाने यांनी भाजपाच्या स्वीटी सिंह यांचा १० हजार २११ मतांनी पराभव केला. काँग्रेस तिसऱ्या स्थानावर राहिली.

एमआयएम २०१५ पासून बिहारमध्ये निवडणूक लढवते आहे. यावेळी त्यांना काँग्रेसच्या या मतदारसंघात यश मिळाले. एमआयएमने २०१५ साली विधानसभा निवडणुकीत सीमांचलमध्ये ६ उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. त्यांनी चांगली मते घेतली पण जिंकू शकले नाहीत. काँग्रेस २००९ पासून हा मतदारसंघ आपल्याकडे राखून होती. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिली. काँग्रेसला आरजेडीने पाठिंबा दिला होता. किशनगंज हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे. किशनगंज ही सीमांचलमधील सर्वात महत्त्वपूर्ण जागा मानली जाते. इथे मुस्लिम समाज ७० टक्के आहे.