प्रथमच जया बच्चन मराठी चित्रपटात करणार काम

jaya Bachchan

मुंबई :- बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) अ‍ॅक्टिंग सोडून पूर्ण वेळ राजकारणात रमल्या आहेत. १९७३ साली जया यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी लग्न केले आणि त्यानंतर चित्रपटांपासून दूर झाल्या. काही मोजके चित्रपट वगळता त्या सिनेसृष्टीत फारशा कमी झळकल्या. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘सनग्लास’ या चित्रपटात त्या शेवटच्या झळकल्या. तब्बल सात  वर्षांनंतर जया बच्चन ‘कमबॅक’साठी सज्ज झाल्या आहेत.

जया बच्चन लवकरच एका मराठी सिनेमात झळकणार आहेत. हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा असणार आहे. अनुमती, पोस्टकार्ड, बायोस्कोप यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या सिनेमात जया दिसणार आहे. जया वा मेकर्सकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र ही बातमी वाचून जया बच्चनचे चाहते आनंदात आहेत.

‘सनग्लास’ या सिनेमात जया अखेरच्या दिसल्या होत्या. त्यांनी पहिल्यांदा नसीरुद्दीन शहासोबत काम केले होते. २०१६ मध्ये ‘की अँड का’ या सिनेमात त्यांनी कॅमिओ रोल केला होता. जया बच्चन यांनी चार दशकांचा काळ गाजविला आहे. वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. पाठीवर रुळणारे लांब केस आणि हसण्याचा एक वेगळा अंदाज यामुळे त्यांनी प्रेक्षकांना मोहित केले. १९७१ मध्ये जया बच्चन यांचा ‘गुड्डी’ हा सिनेमा हिट झाला. त्यानंतर एकामागून एक सिनेमे केले. पुढे त्यांनी राजकारणातही प्रवेश केला.

जया बच्चन यांचा पहिला चित्रपट ‘महानगर’ होता. यावेळी जया केवळ १५ वर्षांच्या होत्या. ‘महानगर’नंतर जया यांनी अनेक बंगाली चित्रपटांत काम केले. १९७१ मध्ये त्यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER