60 वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये असे घडले प्रथमच…

First time in 60 years for Indian Cricket

भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघाचा सध्याचा ऑस्ट्रेलिया दौरा (Australia) हा गेल्या काही वर्षातील सर्वात चर्चेत राहिलेला दौरा आहे. भारतीय खेळाडूंच्या दुखापती, त्यानंतरही त्यांनी दाखवलेली जिद्द आणि ऑस्ट्रेलियन्सचे रडीच्या डावातून शिवराळ वर्तन यामुळे ही मालिका दीर्घकाळ स्मरणात राहिल त्याचप्रमाणे जेवढे वेगवेगळे खेळाडू भारताला या मालिकेतील प्रत्येक सामन्यात खेळवावे लागले त्यामुळेसुध्दा ही मालिका क्रिकेट इतिहासात नोंदली जाईल. ब्रिस्बेन (Brisbane) कसोटीत टी. नटराजन (T. Natrajan) व वाॕशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांचे पदार्पण आणि शार्दुल ठाकुरचे (Shardul Thakur) संघात पुनरागमन हिशेबात धरता भारताने चार सामन्याच्या या कसोटी मालिकेत तब्बल 20 खेळाडू खेळवले आहेत. गेल्या 60 वर्षात भारताने एका मालिकेत खेळवलेले हे सर्वाधिक खेळाडू आहेत.

यात चेतेश्वर पुजारा व कर्णधार अजिंक्य रहाणे हे दोन वगळता इतर कोणताही खेळाडू पूर्ण चार सामने खेळलेला नाही. मात्र एकाच मालिकेत एवढे वेगवेगळे खेळाडू खेळवण्याचा हा विक्रम नाही. विक्रम आहे तब्बल 26 खेळाडू खेळवण्याचा आणि तब्बल 68 वर्षांपूर्वीचा म्हणजे1952-53. त्यावेळी भारताने मायदेशातच पाकिस्तानविरुध्दच्या मालिकेत थोडथोडके नाही तर तब्बल 26 खेळाडू खेळवले होते. त्या मालिकेत पाच सामने होते आणि यावेळी चार…आताच्या मालिकेतही पाच सामने असते तर आताच 20 खेळाडू असल्याने कदाचित या 26 च्या जवळपास आपण नक्कीच पोहोचलो असतो.

भारताने एका मालिकेत 20 किंवा अधिक खेळाडू खेळवलेली शेवटची मालिका होती 1960-61 ची. म्हणजे 60 वर्षानंतर एवढे वेगवेगळे खेळाडू खेळवायची वेळ भारतावर आली आहे. सिडनी कसोटीत जसप्रीत बुमरा, हनुमा विहारी, रवीचंद्रन अश्विन जायबंदी झाल्याने ब्रिस्बेन कसोटीत वाॕशिंग्टन सुंदर, टी. नटराजन व शार्दुल ठाकूर यांना खेळवावे लागत आहे. हे तिघेही मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात संघाबाहेरच होते.

भारताने एकाच मालिकेत 20 पेक्षा अधिक खेळाडू खेळवले अशा मालिका..

खेळाडू– सामने— विरुध्द— यजमान— वर्ष
26—— 5 ——– पाक —– भारत —– 1952-53
24—— 5 ——– वे. इं. —– भारत —– 1958-59
23—— 5 ——– इंग्लंड —- भारत —– 1951- 52
21—— 5 ——- आॕस्ट्रे. —– भारत —– 1959- 60
20—— 5 —— न्यूझीलंड — भारत —– 1955- 56
20—— 5 ——- पाक ——– भारत —– 1960- 61
20—— 4 ——- आॕस्ट्रे. —— आॕस्ट्रे. —- 2020- 21

या तक्त्यावरुन लक्षात येईल की आश्चर्यकारकरित्या मायदेशातील मालिकांतच भारताला अधिकाधिक खेळाडू वापरावे लागले आहेत.पहिल्यांदाच परदेशातील मालिकेत भारतीय संघ 20 किंवा अधिक खेळाडू खेळवत आहे आणि पहिल्यांदाच या मालिकांत चारपेक्षा कमी सामने आहेत. 26 खेळाडू खेळवले ती मालिका भारत व पाकिस्तानदरम्यानची पहिली मालिका होती. पाकिस्तानचीही ती पहिलीच मालिका होती आणि भारताने जिंकलेली ही पहिलीच मालिका होती.

भारताने या मालिकेत खेळवलेले 20 खेळाडू

1) पृथ्वी शाॕ, 2) मयंक अगरवाल, 3) चेतेश्वर पुजारा, 4) विराट कोहली, 5) अजिंक्य रहाणे, 6) हनुमा विहारी, 7)वृध्दिमान साहा, 8) रवीचंद्रन अश्विन, 9) उमेश यादव, 10) जसप्रित बुमरा, 11) मोहम्मद शामी, 12) शुभमान गील, 13) रिषभ पंत, 14) रवींद्र जडेजा, 15) मोहम्मद सिराज, 16) रोहित शर्मा, 17) नवदीप सैनी, 18)वाॕशिंग्टन सुंदर, 19) शार्दुल ठाकूर आणि 20) टी. नटराजन.

ही बातमी पण वाचा : क्रिकेटच्या इतिहासातील आजच्या दिवशी १८९४ मध्ये एका चेंडूवर बनवले होते २८६ धावा, संपूर्ण किस्सा जाणून घ्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER