आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढं पाणी पाहतोय – शरद पवार

मुसळधार पावसातही शरद पवारांची दैनंदिन कामे थांबली नाहीत. मंत्रालयासमोरील साचलेले पाणी पाहून अचंबित

Sharad Pawar

मुंबई: मागिल तीन दिवसांपासून पावसाने मुंबईला (Mumbai Rain) अक्षरशः झोडपले आहे. मुंबईच्या सखल भागात पूरस्थितीसारखे पाणी साचले आहे. मुंबईत प्रचंड पाऊस कोसळल्याने मंत्रालयासमोरही पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. मंत्रालयासमोरील तुंबलेलं पाणी पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही (Sharad Pawar) आश्चर्यचकीत झाले. मंत्रालयासमोर आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढं पाणी पाहतोय, अचंबित होऊन शरद पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा:- मुंबईत मुसळधार : पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन

मुंबईत मुसळधार पाऊस असतानाही शरद पवार मुंबईच्या रस्त्यावर दिसले. पावसाची तमा् न बाळगता त्यांनी त्यांची नित्य कामे सुरूच ठेवली. पाऊस असो वा वादळ शरद पवार कधीही थांबत नाहीत हे महाराष्ट्राने पाहिले आहे. मुंबईत मुसळधार पाऊस असतानाही काल संध्याकाळी मंत्रालयासमोरी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली.

बैठक संपल्यानंतर रात्री पवार आणि सुप्रिया सुळे हे घरी जायला निघाले. यशवंतराव चव्हाण सेंटरमधून पवारांची गाडी बाहेर पडून एअर इंडियाच्या दिशेने निघाली. यावेळी मंत्रालयासमोर प्रचंड पाणी साचले होते. पूरस्थिती झाली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे या ड्रायव्हरला गाडी पाण्यातून बाहेर काढण्याबाबतच्या सूचना देत होत्या. मुंबईत अविश्वसनीय पाऊस पडलाय. मंत्रालयासमोर समुद्रच निर्माण झाल्यासारखं वाटत आहे असं त्या म्हणाल्या.

त्यावर शरद पवारांनीही मंत्रालयासमोरील पूरपरिस्थितीवर आश्चर्य व्यक्त केलं. मंत्रालयासमोर एवढं पाणी कधीच भरत नाही. आयुष्यात पहिल्यांदाच एवढं पाणी पाहतोय, असं पवार म्हणाले.

दरम्यान, मंत्रालयाच्या पूढे पाणी कमी होते. पवार सुखरूप घरी पोहोचले.बैठकीनंतर शरद पवार सुप्रिया सुळे घरी जात असताना पाऊस सुरू असल्याने सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून मुंबईतील पावसाचं लाइव्ह सुरू केलं. त्यावेळचा हा बाप – लेकीचा संवाद.

दरम्यान, काल मुंबईत दिवसभरात ३२८.२८ मिमी पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात पडलेला आजवरचा हा सर्वात मोठा पाऊस आहे. गेल्या ४५ वर्षांत ऑगस्ट महिन्यात पडलेला हा विक्रमी पाऊस असल्याचं हवामान खात्याने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER