आयपीएलमध्ये पहिल्यांदाच माजीविजेता संघ शेवटच्या स्थानी

Rajasthan Royals

यंदाचे आयपीएल (IPL) अतिशय रंगतदार ठरले आहे. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यापर्यंत स्पर्धेत चुरस कायम आहे.पहिल्यांदाच स्पर्धेतील प्रत्येक संघाने किमान सहा सामने जिंकले आहेत. गेल्या वर्षी सहा सामने जिंकणारा संघ (सनरायजर्स) प्ले आॕफसाठी पात्र ठरला होता आणि यंदा सहा सामने जिंकणारे संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानी आहे.

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच जो संघ गुणतालिकेत तळाला आहे त्याचे 12 गूण आहेत. राजस्थान राॕयल्स (Rajsthan Royals) संघावर सहा सामने जिंकून ही वेळ आली आहे.

आयपीएलच्या इतिहासात तळाला असलेल्या संघाने प्रथमच सहा सामने जिंकले आहेत आणि पहिल्यांदाच एखादा माजी विजेता संघ शेवटच्या स्थानी आला आहे. राजस्थानसाठी पहिल्यांदाच शेवटचे स्थान आले आहे.

आयपीएलच्या इतिहासात गुणतालिकेत दिल्लीचा (DC) संघ सर्वाधिक चार वेळा शेवटच्या स्थानी आला आहे तर किंग्ज इलेव्हनला तीन वेळा हे शेवटचे स्थान मिळाले आहे. राॕयल चॕलेंजर्स दोन वेळा शेवटून पहिले आहेत तर डेक्कन चार्जर्स, कोलकाता नाईट रायडर्स, पुणे वाॕरियर्स आणि आता राजस्थान राॕयल्स एकएकदा शेवटच्या स्थानी आले आहेत.

मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद हे तीनच संघ असे आहेत जे कधीच शेवटच्या स्थानी आलेले नाहीत. यंदा चेन्नईवर ही वेळ येणार होती परंतू राजस्थानने शेवटचा सामना 60 धावांनी गमावल्याने त्यांच्यावरची ही नामुष्की टळली. चेन्नई व राजस्थान दोघांचेही प्रत्येकी 12 गूण असले तरी नेट रनरेट खराब राहिल्याने राजस्थान शेवटच्या स्थानी आले आहे.

आयपीएलमधील दरवर्षीचे शेवटचे संघ (विजय व गूण या क्रमाने)

2008 – डेक्कन चार्जर्स – 2 – 4
2009 – केकेआर – 3 – 7
2010 – किंग्ज इलेव्हन – 4 – 8
2011 – दिल्ली – 4 – 9
2012 – पूणे वाॕरियर्स – 4 – 8
2013 – दिल्ली – 3 – 6
2014 – दिल्ली – 2 – 4
2015 – किंग्ज – 3 – 6
2016 – किंग्ज – 4 – 8
2017 – बंगलोर – 3 – 7
2018 – दिल्ली – 5 – 10
2019 – बंगलोर – 5 – 11
2020 – राजस्थान – 6 – 12

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER