आधी_आरक्षण_आणि_मगच_भरती.. खा. संभाजीराजे

Maratha Reservation - Sambhaji Raje

नवी दिल्ली : आधी_आरक्षण_आणि_मगच_भरती.. हीच मराठा समाजाची (Maratha Community) भूमिका आहे. मराठा समाजाच्या 13% जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती काढली जाऊ नये, मग ती पोलीस भरती असो की ‘एम पी एस सी’ ची किंवा आणखी कुठलीही परीक्षा असो मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय निकाली लागल्या शिवाय भरती नको. अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

मराठा समाज इतर कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. इतर सर्व समाज मराठा समाजाच्या सोबत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) वंशजांनी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला सरकारने प्राधान्य द्यावं हीच भूमिका घेतली आहे. त्यांचे मी समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो.

सरकारने पोलीस भरती चा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. ही समाजाच्या वतीने विनंती वजा सूचना आहे, असे खा. संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER