‘आधी मराठा, आता ओबीसी समाजाची माती केली’, चित्रा वाघ यांची घणाघाती टीका

Chitra Wagh

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. त्यावरुन भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आता भाजपच्या उपनेत्या चित्रा वाघ यांनीही सरकारवर घणाघाती टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण झाल्याची टीका वाघ यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत भाष्य केलेलं तेव्हा सरकार म्हणून आपण काय केलतं? आधी मराठा आणि आता ओबीसी समाजाची माती केलीत. वर तोंड करून म्हणतात आम्ही ओबीसींसाठी लढू. अरे तुमच्या नाकर्त्यापणामुळे आरक्षण गेलं, लढायला आमचे आम्ही भक्कम, सरकार म्हणून तुम्ही काय करणार ते सांगा, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला. हे ट्वीट करताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील संभाषणाचा आधार घेतला असून त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, भाजपचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘ठाकरे सरकारचा आणखी एक प्रताप. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. वारंवार सूचना करून देखील ठाकरे सरकारची सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात दिरंगाई. निर्बुद्ध व्यक्तीच्या हातात कारभार दिल्याचे हे परिणाम आहेत. होते ते देखील सांभाळता आलं नाही’, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button