
रजनीकांतचा (Rajinikanth) जावई म्हणून ओळख असली तरी धनुषने त्याच्या अभिनयाने साऊथमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. रजनीकांतप्रमाणे त्याची फॅन फॉलोईंग नसली तरी त्याच्या फॅन्सची संख्याही कमी नाही. तसे पाहायला गेले तर रजनीकांतच्या फॅन्सच्या संख्येला ओलांडने अजून कोणत्याही नायकाला जमलेले नाही. आजही रजनीकांतच्या सिनेमाची घोषणा होताच तो कोट्यावधी रुपयांना विकला जातो. मात्र ही बातमी रजनीकांतबाबत नसून अभिनेता धनुषबाबत आहे. धनुषने (Dhanush) गेल्या वर्षी ‘कर्णन’ (Karnan) सिनेमाला सुरुवात केली होती. हा सिनेमा आता यावर्षी रिलीज होणार असून त्याचा पहिला लुक रविवारी जारी करण्यात आला. या फर्स्ट लुकमध्ये धनुष खूपच अॅग्रेसिव्ह दिसत असून त्याच्या चेहऱ्यावरून रक्त ओघळताना दिसत आहे. त्याच्या हातात बेड्याही दिसत आहेत आणि त्याच्या मागे खूप लोक उभे असलेलेही दिसत आहेत. फर्स्ट लुक दोन भाषांमध्ये रिलीज करण्यात आला असून सिनेमाच्या रिलीजची डेटही घोषित करण्यात आली आहे.
सिनेमाचा फर्स्ट लुक धनुषने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले आहे, “कर्णनचा फर्स्ट लुक आणि थिएटरमध्ये रिलीजची तारीख. यासोबत पोस्टरवर 9 एप्रिल 2021 अशी रिलीज डेट लिहिण्यात आलेली आहे. ‘कर्णन’ सिनेमाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक मारी सेल्वाराज करीत आहे. मारीनेही सोशल मीडियावर फर्स्ट लुक शेअर करीत लिहिले आहे, “न्यायाचा आत्मा कधीही मरत नाही. तुमच्यासोबत बहुचर्चित ‘कर्णन’ चा फर्स्ट लुक आणि रिलीज डेट शेयर करताना मला खूप आनंद होत आहे. ‘कर्णन’मध्ये धनुषसोबत राजिशा विजयन, लक्ष्मी प्रिया चंद्रमौली, नटराजन सुब्रमण्यन, योगी बाबू, अलगामपरुमल या कलाकारांच्या भूमिकाही आहेत. संगीत संतोष नारायणनने दिले आहे.
धनुषच्या या सिनेमाची साऊथमध्ये खूपच चर्चा असून बॉलिवूडमध्येही या सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा सिनेमा कदाचित हिंदीमध्येही डब करून दाखवण्याचा विचार निर्माते करीत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला