पहिला हप्ता : अतिवृष्टी व पुराच्या नुकसान भरपाईचा निघाला आदेश

CM Uddhav Thackeray

मुंबई : जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी २२९७ कोटी ६ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचा आदेश आज काढण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून १० हजार कोटींची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरीत करण्यात येणार आहे.

विदर्भ (Vidharbha), पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा (Marathwada) भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी (10 thousand Crore Package)रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली होती. हा मदतनिधी वाटप करण्यास निवडणूक आयोगाने (Election Commission) ठाकरे सरकारला परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड जाणार आहे.

परतीच्या पावसाने विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतीचे खूप नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात वाहून गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानसग्रस्त भागाची पाहणी करून १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार होती. पण, राज्यात शिक्षक आणि पदवीधर विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमुळे राज्य सरकारने पहिल्या हप्त्यात चार हजार कोटी रुपये मंजूर केले असले तरी निवडणूक आचारसंहितेमुळे ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात अडचण होती. याबाबत राज्य सरकारने निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार केला होता.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत निवडणूक आयोगाला आचारसंहितेमध्ये निधी वाटपात अडचण येऊ नये, त्यास मंजुरी द्यावीस अशा आशयाचे पत्र पाठवले होते. आज निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठवून निधी वितरीत करण्यास हरकत नसल्याचे कळवले. आता दिवाळीआधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात साधारण: ४ हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER