आधी ‘राष्ट्रवादी’वासी चिरंजीवांवर कृपा; आता भास्कर जाधवांनाही शिवसेनेचे बक्षीस

Shivsena - NCP - Maharastra Today

मुंबई :  शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने, तर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सूचनेने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना प्रवक्तेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. भास्कर जाधव यांचे राष्ट्रवादीत असलेले चिरंजीव विक्रांत जाधव (Vikrant Jadhav) यांना नुकतंच रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी शिवसेनेने दिली होती.

त्यानंतर आता भास्कर जाधवांनाही शिवसेनेकडून मोठी भेट असल्याचे म्हटले आहे .जाधवांनी आधी सुपुत्रासाठी अध्यक्षपद पदरात पाडून घेतलं. त्यानंतर आता प्रवक्तेपदाची बक्षिसी भास्कर जाधवांना दिल्याने त्यांची नाराजी काहीशी दूर होण्याची शक्यता आहे. खरं तर भास्कर जाधव यांचे बंधू बाळ जाधव यांच्यासाठी खुद्द शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. परंतु काका आणि पुतण्यामधील शर्यतीत पुतण्याने बाजी मारली. दरम्यान शिवसेनेला रत्नागिरी जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे ३९ इतकं संख्याबळ आहे.

गुहागर मतदारसंघातून विजय मिळवलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव मंत्रिपद न मिळाल्याने काही काळापासून नाराज होते. भास्कर जाधव शिवसेनेत आले असले, तरी त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे विक्रांत यांना रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपद कसं द्यावं, हा प्रश्न शिवसेनेला होता. मात्र भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेने त्यावर तोडगा काढला असल्याचे चित्र आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button