‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा !’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला

atul bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई :- मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच ‘कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा’ अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली आहे. ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या शासकीय पुस्तकाचं आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या या मागणीवर भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आधी तुमच्या राज्यात असलेल्या औरंगाबादचं (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar) तर करा, असं खोचक ट्विट अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर केलं आहे.

‘बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु त्या आधी तुमच्या हाती असलेल्या राज्यात औरंगाबादचे संभाजीनगर तर करा… नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा. ’ असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मिस्कील टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER