एलएनजीवरील पहिले क्रुझ जहाज येणार भारतात

मुंबईत तळ असलेल्या कोस्टा क्रुझचा पुढाकार

First cruise ship on LNG to arrive in India

मुंबई :- ब्रँडचे नवीन फ्लॅगशिप म्हणून, कोस्टा स्मेराल्डा हे द्रवरुप नैसर्गिक वायूचा (एलएनजी) वापर करणारे पहिले जहाज बनले आहे. हे एक इंडस्ट्री इनोव्हेशन जे पर्यावरणीय परिणामांना लक्षणीयरीत्या कमी करते. हे पहिले क्रूझ जलपर्यटनासाठी २१ डिसेंबर २०१९ रोजी सावोनाहून सुटेल. मुंबईहून ते ऑपरेट होणार आहे.

भारतात सध्या क्रुझ पर्यटन झपाट्याने वाढते आहे. मुंबईतील कोस्टा कंपनीने त्यात आघाडी घेतली आहे. मुंबईत तळ असलेल्या कोस्टा क्रूझने कोस्टा स्मेराल्डाची डिलिव्हरी घेतली आहे. एलएनजीवरील हे जहाज समुद्री उद्योगातील सर्वात प्रगत इंधन तंत्रज्ञान आहे. पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी एकनाविन्यपूर्ण उपक्रमाचा एक भाग आहे. फिनलँडमधील तुर्कु येथील मेयर शिपयार्डमध्ये हे जहाज तयार झाले आहे.

मोबाइल कंपन्या येणार नफ्यात

कोस्टा स्मेराल्डा ऑक्टोबर २०१९ मध्ये सेवेत दाखल होईल. जगातील सर्वात स्वच्छ “जीवाश्म इंधन” असलेल्या एलएनजी द्वाराचलित पहिले कोस्टा जहाज असेल. २६०० हून अधिक स्टेटरुमसह असलेले तसेच आनंद, स्वाद आणि उत्सव यांना समर्पित आगामीकोस्टा फ्लॅगशिप आपल्या पाहुण्यांना इटलीच्या दौरावर घेऊन जाईल.

सल्फर ऑक्साईड्सच्या उत्सर्जनाला प्रतिबंध करून हवेची गुणवत्ता यामुळे सुधरेल. हे नायट्रोजन ऑक्साईड्स आणि कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन लक्षणीय प्रमाणात कमी करते. कोस्टा स्मेराल्डा आणि तिचे सिस्टर शिप २०२१ मध्ये लॉन्च होणार आहे, हे २०२५ पर्यंत २५ टक्के कार्बन फूटप्रिंट कमी करेल.