गुड न्यूज : कोल्हापुरातील पहिल्या कोरणा ग्रस्त महिलेचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

woman in Kolhapur report negative

कोल्हापूर : इस्लामपूर येथील नातेवाईकांच्या संपर्कात येवून कोरोना पॉझिटीव्ह झालेल्या कोल्हापुरातील पेठ वडगाव येथील महिलेच रिपोर्ट आज बुधवारी निगेटीव्ह आला. यामुळे नागरिकांनी अखेर निश्वास सोडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन कायम पाळून नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे

पेठ वडगाव येथील युवती इस्लामपूर येथील नातेवाईकांच्या संपर्कात येवून कोरोना पॉझिटीव्ह आली होती. यामुळे वडगाव शहरात एकच खळबळ उडाली होती. पालिका व पोलीस प्रशासन दक्ष होवून शहरात विविध उपाययोजना करून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी यंत्रणा रात्रदिवस राबत आहे. या पार्श्वभूमीवर या युवतीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. यामुळे वडगाव शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. लॉक डाऊन नागरिकांनी पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. दिवसभर विविध भागात पोलिसांनी मोटारसायकल चालकांना अडवून कारवाई केली. कोल्हापूर शहरा मॉर्निंग वॉक जाणाऱ्या 50 लोकांवर पोलिसांनी कारवाई केली.