मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणाला; चुरशीच्या लढतीत फडणवीसांची ठाकरेंवर मात

CM Uddhav Thackeray and devndra fadnavis

मुंबई : एका वृत्तसमूहाने ‘मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणाला’ या प्रश्नावर केलेल्या सर्वेक्षणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना अल्पशा आघाडीने हरवले.

फडणवीस यांना ५२.८ तर उद्धव ठाकरेंना ४७.२ टक्के मत मिळाली राज्यात जनता कोरोनाच्या साथीने त्रस्त असताना विरोधी पक्ष भाजपाचे समर्थक देवेंद्र फडणवीसच कसे चांगले मुख्यमंत्री होते व उद्धव ठाकरे अयशस्वी ठरल्याचा दावा करताना दिसत आहेत तर, शिवसेना समर्थक उद्धव ठाकरेंनी करोनाची परिस्थिती अत्यंत कुशलतेने हाताळल्याचा दाखला देत तेच जास्त सक्षम मुख्यमंत्री असल्याचा प्रचार करत आहेत.

दरम्यान, एका वृत्तसमूहाने याच मुद्द्यावर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ‘मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती द्याल’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. २४ तासांच्या या सर्वेक्षणात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात अटीतटीची चुरस झाली. चार लाखांहून जास्त जणांनी मत नोंदवले. अंतिम निकालात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली. फडणवीस यांना ५२.८ तर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ४७.२ टक्के मत मिळाली

जनमत चाचणी सर्वसामान्य वाचकांसाठी होती पण, आपल्या नेत्याला जास्तीत जास्त मत मिळावी यासाठी कार्यकर्ते व नेत्यांना पोलमध्ये सहभागी करण्यासाठी दोन्ही पक्षांनी प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button