चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी फायर थेरेपीचे वेड !

fire therapy

लंडन :- प्रत्येक स्त्रीला वाटत असते की आपला चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसावा. असे न वाटणारी एकही स्त्री आपल्याला बघायला मिळणार नाही. सुंदरतेसाठी केवळ स्त्रियाच नाही तर पुरुषही अनेक उपाय करतात. अशाच एका उपायाचे वेड लंडनमधील लोकांना लागले आहे. चेहरा सुंदर दिसावा म्हणून तिथे चक्‍क फायर थेरपी करण्यात येते. यामध्ये चूक झाली तर चेहरा सुंदर दिसण्याऐवजी भाजून बिघडण्याचा धोका असतो, हे माहिती असतांनाही अनेक सुंदरतप्रेमी ही थेरेपी करतात.

ही बातमी पण वाचा : खोबरेल तेलाचा असा उपयोग करून चेहरा करा चमकदार

फायर थेरपी केवळ सौंदर्यवृद्धीसाठीच नाही, तर अन्य काही कारणांसाठी देखील केली जाते, ज्यामध्ये एक विशिष्ट तंत्र वापरले जाते. या थेरपीमध्ये अल्कोहोल शिंपडलेल्या एक टॉवेलखाली चेहरा तीस सेकंद ते एक मिनिटासाठी झाकून ठेवला जातो. आगीमुळे चेहर्‍याला झळ पोहोचू नये, यासाठी या टॉवेलखाली आणखी एक टॉवेल ठेवला जातो. त्यानंतर पुढील बाजूने फायर फ्लेम दिला जातो. अर्थातच ही थेरपी प्रशिक्षित व्यक्‍तींकडूनच दिली जाते. या थेरपीत चेहर्‍याच्या त्वचेला ऊब दिली जाते. त्यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होतात किंवा सुरकुत्या वाढण्याचा वेग कमी होतो. म्हणून आपला चेहरा नेहमी तरुण दिसावा या अनुषंगाने लंडनमध्ये या थेरेपीचे वेड वाढले आहे.

ही बातमी पण वाचा : मऊ आणि गुलाबी ओठांसाठी हे करा..