उल्हासनगरात बॅगेच्या कारखान्याला भीषण आग

Fire

उल्हासनगर : गेल्या काही दिवसांपासून विविध आगी लागत असून आगीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीय. आज उल्हासनगरमधील श्रीराम टॉकीज परिसरात बॅगेच्या कारखान्यात भीषण आग लागली असून परिसरात आगीचे लोळ पसरले आहेत. रेल्वे लाईनला लागूनच कंपनी असल्यानं रेल्वे सेवेवरही परिणाम, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.