मुंबईच्या मानखुर्दमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल

fire-broke

मुंबई : मुंबईतील मानखुर्द येथील मंडाळे स्क्रॅप गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कोणतीही जीवितहावी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आगीचं अत्यंत रौद्र रुप दिसत आहे. आगीला विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 ते 25 गाड्या दाखल झाल्या आहेत.

जिथे आग लागली त्या भागाला कुर्ला स्क्रॅप म्हटलं जातं. केमिकलचा कारखाना असल्याने ही आग वाढत चालली आहे. आगीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. ही आग वाढू नये, यासाठी अग्निशमन दलाचे जवान पुरजोर प्रयत्न करत आहेत. आगीची भीषणता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूचा परिसर खाली करण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात आजूबाजूला प्लॅस्टिकचेही गोदाम आहेत. आग वाढतच चालली आहे. त्यामुळे परिसरातील प्लॅस्टिकचे गोदामांनाही आग लागण्याची भीती प्रत्यक्षदर्शीनी वर्तवली आहे.

तक्रारी करुनही दखल घेतली जात नाही, आमदार अबू आझमी यांचा आरोप

आगीची माहिती पडताच समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी राज्य सरकारवर आरोप केले. मंडलाच्या मेन रोडच्या येथे एक स्क्रॅप आहे. याबाबत मी जिल्हाधिकाऱ्याकडेदेखील तक्रार केली आहे. 15 एकर जमीन ते अनधिकृतपणे वापरत आहेत. नकली तेल, नकली साबण बनवायचं अवैध काम तिथे होतं. दरवर्षी तिथे आग लागते. मी आठ वर्षांपासून विधानसभेत याबाबत तक्रार करत आहे. ही जागा मुंबईत आहे. आगीमुळे प्रदुषण होतं. चुकीचे काम रोखलं जावं. मी पर्यावरण आदित्य ठाकरे यांनादेखील याबाबत तक्रार केली. त्यांनी दखल घेतली नाही. आतादेखील आग लागली. दोन दिवस येतील आणि तिसऱ्या दिवशी लोक विसरुन जातील, असं अबू आझमी यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER