विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील आयसीयु विभागात आग ; 14 जणांचा होरपळून मृत्यू

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून चौकशीचे आदेश

Maharashtra Today

मुंबई :- एकीकडे राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे दररोजच रुग्णालयातील रुग्णांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे .

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग (fire-at-virar-vijay-vallabh-hospital)लागली आहे. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू (14 Patients Die)झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

माहितीनुसार, विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात आज रात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होतं. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्ण उपचार घेत होते. यातील 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

दरम्यान वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button