कुर्ल्यांत भंगाराच्या गोदामांना भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

fire at scrap warehouses in Kurla

मुंबई : मुंबई आज पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळत आहे. मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामांना (scrap warehouses) भीषण आग (fire) लागली आहे. कुर्ला बस डेपो रोड इथे ही मोठी आग लागली आहे.

मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामांना भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीच्या धुराचे लोट हे १५ ते २० फूट उंचावर जाताना पाहायला मिळत आहे. आग लागलेल्या ठिकाणी अनेक गोदामे आहेत. आग इतरही गोदामांना लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

घटनास्थळी ८ फायर इंजीन, ८ फायर टॅंकर दाखल झाले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button